वेरीकोस वेन्स व अत्याधुनिक उपचारपद्धती

Why We Need Dentist
March 14, 2018
केस प्रत्यारोपणच का?
July 16, 2018

वेरीकोस वेन्स व अत्याधुनिक उपचारपद्धती

वेरीकोज वेन्स म्हणजे फुगलेल्या , गाठी पडलेल्या, सुजलेल्या अशुध्य रक्तवाहिन्या ज्या बऱ्याच वेळा निळ्या जांभळ्या दिसतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वेरीकोज वेन्स चे प्रमाण वाढते आहे त्याविषयी शाश्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी डॉ. मनोज बच्छाव याच्यांशी केलेली चर्चा

प्रश्न – वेरीकोज वेन्स म्हणजे काय?

रक्तवाहिन्याचे वाॅल्व्ह खराब झाल्याने त्यात रक्ताचा प्रवाह उलट दिशेने ह्यायला लागतो रक्त वाहिन्याचे दोन प्रकार असतात. धमन्या म्हणजे artery जी हृदयापासून आपल्या इतर अवयवांना रक्त पोहचवतात. व शिरा म्हणजे veins ज्या शरीराच्या बाकीच्या अवयवापासून हृदयापर्यंत अशुद्य रक्त परत पाठवतात. आपल्या पायाच्या ह्या शिरा गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात काम करणे आवश्यक आहे.

आपल्या खालच्या पायातील स्नायूंचे वाॅल्व्ह पंप (valve) म्हणून कार्य करतात आणि रक्वहीन्यांतील लवचिक आतील भिंती आपल्या हृदयापर्यंत रक्त परत पाठवण्यास मदत करतात. आणि हे वाॅल्व्ह खराब झाले कि वेरीकोज वेन्स बनतात.

प्रश्न- वेरीकोज वेन्स म्हणजे का होतात ?

कारणे

  1. वाढते वय

जसेजसे वय वाढू लागते चाळीशी नंतर रक्तवाहिन्या लवचिकता गमावू लागलात व वाॅल्व्ह कमकुवत होऊ लागतात त्यामुळे ४०-५० वायोवर्ष गटातील ४०% पेक्षा अधिक लोकांमध्ये हा आजार दिसून येतो.

  1. गर्भवती महिला

गर्भधारणेदरम्यान आपल्या हार्मोन्स मधील बदल, पोटातील बाळाच्या वाढीसाठी रक्त संक्रमणात होणारी   वाढ याचा एक दुष्परिणाम म्हणजे वेरीकोज वेन्स

  1. लठ्ठपणा

अतिरिक्त वजन आपल्या रक्तवाहिन्यांवर अधिक दाब निर्माण करतात.

  1. जास्त काळ उभे राहणे

जास्त काळ एकाच स्थितीमध्ये उभे राहिल्यास रक्त प्रवाह व्यवस्थित होत नाही

अतिप्रमाणात वाढलेल्या वेरीकोज वेन्सचे योग्य वेळी उपचार न झाल्यास खराब झालेली वेन फुटून   त्यातून रक्तस्राव होऊ शकतो अथवा त्याचे रुपांतर बर न होणार्या जखमेत होऊ शकत. (Ulcer)

प्रश्न – वेरीकोस वेन्सची लक्षणे कोणती?

  • पायात वेदना
  • पायावर सूज
  • आपल्या घोट्याच्या जवळच्या त्वचेची जळजळ होणे, रंग बदल होणे, सूज येणे.
  • पायावर हिरव्या निळ्या रंगाच्या spider वेन्स दिसणे.
  • बऱ्याच वेळ बसून व व्भे राहून वेदना होणे

प्रश्न – यासाठी कोणत्या उपचारपद्धती उपलब्ध आहेत?

  1. Conservative उपचारपद्धतीcompression stocking आणि व्यायाम

वेरोकोज वेन्स ची सुरुवात झालेली असताना ह्या उपचारपद्धतीने खूप फायदा होतो दुखणे तर कमी होतेच त्याबरोबर आजार अजून दुर्धर होण्यापासून प्रतिबंध होतो यासोबतच रोज नियमित ३० मिनिटे चालवे व अतिरिक्त वजन उचलणे टाळावे.

B)पारंपारिक शस्त्रक्रिया

हि जुनी उपचारपद्धती असून यात परंपरागत पद्धतीने खराब रक्त वाहिन्या शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात येतात. यात कमरेखालील भागात भूल देण्यात येते व रुग्णाला कमीत कमी एक दिवस रुग्णालयात भारती व्हावे लागते.

 

C)EVLT लेजर उपचारपद्धती

ह्यात सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने खराब झालेल्या रक्त वाहिन्या शोधून त्यावर अत्याधुनिक लेजर मशीनच्या सहाय्याने लेजर किरणांचा मारा केला जातो. आज जगामधली सर्वात अत्याधुनिक व लोकप्रिय अशी हि उपचारपद्धती आहे ह्यात रुग्णाला पूर्ण भूल देण्याची गरज नसते व हि उपचारपद्धती daycare आहे (walk in – walk out ) ह्याला फक्त एक ते दीड तास लागतात व रुग्ण लगोलग कामावर रुजू होतो.

सध्या नाशकात सर्वप्रथम  अत्याधुनिक जर्मन मेड बायोलेटिक लेजर सुप्रसिध्य प्लास्टिक सर्जन डॉ. मनोज बच्छाव यांच्या इलाईट कॉस्मेटिक व लेजर सेंटर येथे उपलब्ध आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *